Monday, February 22, 2010

ऐकण्यासारखे काही -

तुम्ही radio कितपत ऐकता ? म्हणजे माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ मी radio ऐकण्यात घालवते, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती व्हायची नाही इतका मी radio ऐकते .
दर रविवारी सकाळी ७ ते ११ पुण्याच्या radio city ९१.१ FM वर 'मराठमोळी सकाळ ' नावाचा एक अप्रतिम, लई भारी मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागतो. 'ऋतू हिरवा' ची अख्खी कॅसेट, 'देवाघरचे ज्ञात कुणाला' , ' जैत रे जैत 'ची गाणी, जुनी नाट्यगीतं त्याचबरोबर नवीन ' गालावर खळी..' इ. इ मस्त गाणी लागतात. बाकी radio city वर आठवडाभर काही फार ऐकण्यासारखे नसते. (त्यातला तो 'छोटा छत्री 'नावाचा प्राणी तर महा वैतागवाणा आहे, एक वेळ 'सूद' परवडला.)
बाकी आठवडाभर (दिवसा ) मी जास्तीत जास्त ऐकते Red FM ९३.५ यावरचे कार्यक्रम. नेहमीपेक्षा थोडे वेगळे आहेत. खासकरून यांचे निवेदक - नेहमी सारखी नम्र , गोड आवाजाची मंडळी नाहीत. उदा. सकाळी १० ते १२ दरम्यानची 'मानसी ' नावाची निवेदक. काही नाही फक्त bollywood ची gossip ती ऐकवते, पण ती असली जबर आहे की बस रे बस , पंजाबी भाषेत ती पार 'वाभाडे ' काढते सगळ्यांचे! (बऱ्याचदा 'अति'ही करते, हे ओघानं आलंच)
याच्यावरचे इतर कार्यक्रम ' हटके ' आहेत. उदा. 'कवी की कल्पना ' नावाचा एक कार्यक्रम -''झुबी डुबी झुबी डुबी पम्पारा , नाचे ये पागल स्टुपिड मन '' - अरे भाई, वहा बेचारी झुबी डूब रही है, और कवी का पागल मन नाच रहा है , कैसी idiot टाइप की कल्पना है असं काही तरी 'desection ' चाललेले असते .
यांची 'बिजलीबाई' तर एकदम कडक आहे, भ्रष्टाचारी, फसवणूक, करणाऱ्या लोकांना ती असलं भारी फटकारते, ते सांगण्यात मजा नाही( त्या आवाजानं उषा नाडकर्णीची आठवण होते ) , ऐकून बघा . 'पप्पुदिया' पण भारी आहे. एकूण Red FM हा चांगला Timepass आहे .

5 comments:

 1. हैदराबादला नविन जेंव्हा रेडिओ सिटी सुरु झाला होतो त्यावेळेस खुप वेळ ऐकलेला आहे, त्याकाळी संपुर्ण वेळ हिन्दी गाणी असायची, पण जेंव्हा पासुन केवळ तेलुगु सुरु झाली तसं रेडिओ ऐकणे सुटले.... आता क्वचित रात्री ११ ते १ या वेळेत जुनी गाणी असतात त्या वेळी ऐकतो...पण जास्त नाही...
  मराठी तर नाहीच नाही.... :-(

  ReplyDelete
 2. आनंद,
  तुम्ही माझ्या ब्लॉगचे पहिले follower . ब्लॉग वाचत असाल, पण प्रतिक्रिया प्रथमच नोंदवलीत त्याबद्दल धन्यवाद .

  ReplyDelete
 3. बिजली बाई च्या आवाजा बद्दल चे निरिक्षण चांगले आहे. तो खरोखर उषा कुलकर्णी शी साम्य दर्शवतो.

  ReplyDelete
 4. आनंद,
  DTH सेवेचा लाभ घ्यायचा विचार का करत नाही? हैद्राबादमध्ये राहूनही 'घर बैठे बैठे आनंद, हर राज्य का हर भाषा का' घेता येईल.

  ReplyDelete
 5. शीतल,
  धन्यवाद, पण माझ्या मते त्या 'उषा नाडकर्णी' आहेत, कुलकर्णी नाहीत.

  ReplyDelete