Monday, November 23, 2009

देवांचं नशीब सध्या जोरावर !

आमच्या जुन्या गल्लीतले सारेच देव भाग्यवान आहेत ! बहुधा त्या गल्लीत आपल्याला जागा मिळावी म्हणून देवादेवात स्पर्धाही लागत असेल . तर त्या गल्लीतल्या स्वामी समर्थांवर सध्या भक्तांचीच कृपा झालीय .( 'जीर्णोद्धार' हा शब्द ही या दृष्टीने विचारात घेण्याजोगा ! देवही जीर्ण होतो की काय?) मी सुरुवातीला जेव्हा तिथे राहायला गेले तेंव्हाच , ते छोट मंदिर आठवतंय - त्या मंदिरात कुणी दिवा लावायलाही चुकूनच यायचं . रस्त्यान जाणारे नमस्कार वगैरेही करत नसतील . अचानक या मंदिराचं भाग्य फळफळल . नक्कीच कुणाचातरी नवस पूर्ण झाला असावा - स्वामी समर्थांना दररोज भरजरी पोशाख , समोर समई , धूप , बल्ब लागला . गाणी सुद्धा लागायला लागली , कदाचित एखादा पुजारीही नेमला गेला असेल . एकदा तर तिथं ' अन्नकोट ' उत्सवही झाला . एकूणच जाणारे येणारे दखल घेऊ लागले .
अर्थात या गल्लीतला म्हसोबा जास्त भाग्यवान आहे . त्याच्या नावे चार दिवसांचा उत्सव भरला होता , २० साउंड डेकची मोठी भिंतच उभारली होती. फुलांच्या मोठ्या कमानी , नाचायला आली होती ' प्रसिद्ध सिनेतारका दीपाली सय्यद ' , शिवाय नगरसेवकाच्या हस्ते आरत्या , पाककृती स्पर्धा , विविध गुणदर्शन अशी 'जंगी' सांस्कृतिक मेजवानी (?) होती . देव मात्र छोटासा , शेंदूर फासून कोपऱ्यात ठेवलेला !

Friday, November 20, 2009

सहानुभाव काही फक्त माणसांचीच ' मिराशी ' नव्हे .

एका दुकानासमोर पाहिलेला छोटासा प्रसंग ! एक मोठी घूस मारून पडलेली , रस्त्यावर ! एक कावळा त्यावर बसून मांसाचे लचके तोडत होता . पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा थोडी किळसच आली , पण नंतर लगेच आठवलं - कावळा , गिधाड , मुंग्या , झुरळ ही सगळी आहेत , म्हणून तर आपल जग स्वच्छ आहे .तो कावळा ( ती सुद्धा असू शकेल ) , प्रत्येक वेळेला मांसाचा लचका तोडायचा आणि तो घास , तारेवर बसलेल्या दुसऱ्या कावळ्याच्या चोचीत भरवायचा .
छान वाटल बघून , तो दुसरा कावळा , कावळी , पिल्लू कावळू ( मैत्रीण , आई , बहिण ) कोणीही असेल , पण ' घासातला घास दुसऱ्याला दयावा ' या प्रवृत्तीचा ! प्रत्येक घास वाटून खाल्ला त्या दोघांनी !

Friday, November 13, 2009

सुख म्हणजे ' वेगल ' काय असत ?


मी नुकतीच माझ्या बाबांच्या क्वाटरवर राहायला गेले । आणि अगदी स्वप्नातल वगैरे म्हणतात ना तस घर आहे ते हे लगेच लक्षात आले । दारात गेल्या गेल्या पहिल्यांदा ' ख्रिसमस ट्री ' , समोरच्या दारात अजूनही दिवालीचा किल्ला ! मस्त चार खोल्याच घर , छोटीशी गैलरी - गैलरीतून समोर दिसणारा , केशरी फुलानी , अगदी गैलरीच्या समोर ( जणू माझ्यासाठीच ) फुललेला ' स्पथोडिया ' ! उंचच उंच अशी तीन झाडे , त्यावर येणारी फुलचुखी , सालुन्क्या , घरची आठवण करुन देणारी खारुताई ! मुख्य म्हणजे माणसाचा मागमूस नाही । गर्द झादाँपलीकडे रेल्वेलाइन , दिवासंतन चार वेळातरी मी गैलरीत येऊंन उभारतेच , लगेच फ्रेश वाटत ।
गंमत अशी की भरपूर कपाट असणार हे घर , पण ठेवायला सामानच नाही फारसे ! सगळ्यात महत्त्वाच म्हणजे माझा ' छोटासा कुकिंग गैस ' । मनात आले की वाटेल तो पदार्थ तयार करण सहज शक्य , रोज घरचा स्वयंपाक । दर आठवड्याला मंडइत जाऊंन उत्साहान पिशवीभर भाजी आणन वेळ प्रसंगी बाबांची बोलणी खाऊन ! माझ्या स्वयंपाकघराच्या खिडकीत दररोज ' काळ्या मस्सकल्या ' येतात [ आता पु ल च्या शैलीत 'मस्सकली ' छे अनेकवचन बरोबर आहे का? ] (हो माझ्या खिडकीत काळ्या मस्सकल्याच येतात - गोर्या , मान लचकावनार्या मस्सकल्या यायला आपण सोनम कपूर थोडेच आहोत ? )
मला या घरात आल्यावर एक गो़ष्ट लक्षात आली । घर जर वापरलेले असेल ना तर फारच छान ! आमच्या घरात योग्य जागी खिले ठोकलेले आहेत , कोर्पेट टाकलेल आहे । या घराची फरशीपण स्पेशल आहे , मधल्या गप्स चक्क काचेंन भरलेल्या आहेत । कुणाला हे वाचून यात काय एवढे स्पेशल असेही वाटेल , पण मी या घराच्या सध्या प्रेमातच आहे - हे सगल इतके प्रिय वातान्याच कारण कदाचित आपल माणूस सोबत असणे हेही असेल !

Thursday, November 12, 2009

अँक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा ....

ब्लॉग सुरु करायच होतें मनात खूप दिवसापासून ! पण आज गंमतच झाली । दुसऱ्या एका ब्लॉगवर लॉग इन करताना अचानक मी माझा ब्लॉग सुरु केला । छे ! ही माझी वाक्य बघून मला एकदम संत झाल्यासारख वाटायला लागलय - प्रत्येक वाक्याच्या शेवटी दंड ।
पण भारी वाटतेय - चुका सुधारल्या जातीलच हलू हलू । हसू येतय या हळूच ! बघा आता हलू बरोबर आला ।