Friday, September 23, 2011

मी पाहिलेली छटाक मुंबई..

मी पाहिलेली छटाक मुंबई
मोठ्या मनाच्या थोड्याच माणसांची,
प्रचंड प्रॅक्टिकल आणि उतू जाणाऱ्या श्रीमंतीची,
लिटरली गगनचुंबी टॉवर्सची आणि क्लासिक आर्किटेक्चरल इमारतींची,
चाळींची, वन रुम किचनमधल्या दिमाखदारपणाची आणि
फुटपाथवर झोपणाऱ्या ,एक घोंगडं-ताट-तांब्या एवढाच संसार असणाऱ्या म्हातार आजीचीही,
9.53 वगैरे मला कधीच न पकडता येणाऱ्या लोकल्सची,
मुंबईत चहा चक्क पार्सल मिळतो आणि शहाळंही...!!
लोक समोसा-पाव, भजी-पाव खातात
सरदारच्या पावभाजीसाठी, प्रकाशच्या वड्यासाठी आणि भरतक्षेत्रमधल्या साड्यांसाठी चक्क रांगा लावतात.
मुंबईत गोष्ट सुंदर, भारी, ग्रेट नसते तर ती 'सेक्सी' असते..
मुंबई कष्टकऱ्यांची-
रेल्वे लाईनच्या मध्ये राखलेल्या छोट्या तुकड्यांवर चक्क भाज्या पिकवणाऱ्यांची,
रानभेंडी, रेन ट्री, पेल्टाफोरम आणि मध्येच वाकलेल्या केळींचीही....
मुंबई घाणेरड्या हवामानाची, तिखटा-हळदीला बुरशी लागण्याची,
धाडकन अचानक कोसळणाऱ्या पावसाची
मग हापिसात थ्री-फोर्थ पँटी घालण्याच्या फॅशनीची
आणि त्या पावसातल्या वाफाळणाऱ्या मॅगीची
कायम शेवाळलेल्या भिंतींची..
आणि मला आवडणाऱ्या व्हायब्रंट कलर्सनी रंगवलेल्या
'हम पंछी इक तार के' वगैरे लिहिलेल्या क्रिएटिव्ह भिंतींचीही !
(बहुधा लोकांनी लघवी करु नये म्हणून...)

मुंबईचे सगळे आमदार, नगरसेवक 'कार्यसम्राट' असतात,
म्हणूनच कचराकुंड्या भरभरुन वाहतात, गटारी तुंबतात, माणसं मरतात
मुंबईतली माणसं कायम पैश्यांविषयी बोलतात
आणि सोनचाफ्याची फुलं घेताना मात्र भाव करतात...

मुंबई प्रचंड व्हरायटीची, सोयी सुविधांच्या सुकाळाची
साध्या मिरच्यासुद्धा सहा-सात प्रकारच्या मिळण्याची,
माझ्यासाठी मुंबई म्हणजे,
प्रवासाचं कधीच न वाटणारं 'डेस्टिनेशन'
कामाच्या ठिकाणी सुमारांची सद्दी,
अर्ध्या हळकुंडानं जेजुरी झालेल्या माणसांची गर्दी,
च्यायला 'क' च्या बाराखडीनं माझ्या डोक्याची होणारी मंडई,
शीण घालवणारा लाडका समुद्र,
कोपऱ्यावरचा चाफा पाहून कुणाची तरी आठवण येणं.......
कधीच वेळेवर न होणारं जेवण,
ड्यूटी संपवून भाग भाग डी के बोस करत गाठावी लागणारी लायब्ररी,
अंगणात गेल्यासारखी दर आठवड्याची दादरची फेरी,
फुटाणे खाउन लाडावलेली कबुतरं आणि कर्कश्श कावळे,
मुंबई विझलेल्या गिरण्यांच्या चिमण्यांची,

मुंबई म्हणजे भर समुद्रात उभी करुन ठेवलेली वरळी - वांद्रे सी लिंक ची सतार,
मुंबई भिकबाळी घातलेल्या गणपती बाप्पाची,
देवनारच्या TISS मधल्या दृष्ट लागण्याजोग्या शांततेची,
मुंबई जिथं बसमधल्या लेडिज सीटवर पुरुष कधीच बसत नाहीत...
मुंबई ट्रेनमध्ये भजनं म्हणणाऱ्या, गणपती बसवणाऱ्या , गटारी साजरी करणाऱ्या उत्साही जनतेची,
मुंबई साईबाबांच्या भक्तांची,
मुंबई घरं नसलेल्या कित्येकांची,
वाहणाऱ्या कचराकुंडीत उभारुन पाव शोधणाऱ्या पोराची,
रक्ताळलेल्या माथ्याचं पोर घेउन स्टेशन-स्टेशनवर भीक मागणाऱ्या आईची
ताई, घरची आठवण येतीय म्हणून भर ट्रेनमध्ये माझ्यासमोर रडणाऱ्या बांगड्या विकणाऱ्या -बोटभर चिंधीची
आणि काहीच न करु शकणाऱ्या हताश माझीही.......







12 comments:

  1. अहाहा...भयंकर एक्साईट झालोय ही पोस्ट वाचून. काय लिहू आणि काय नको असे होतेय...त्यामुळेच आत्ता अधिक काही न लिहिता व्यवस्थित जाणीवेत मुरवतो ही पोस्ट...आणि मग जे काही येईल बाहेर, ते लिहितो थोड्याच दिवसात!!

    ReplyDelete
  2. नवख्या नजरेतून एखादे शहर न्याहाळताना अनेक गोष्टी लक्ष वेधून घेतात. काही स्मृतीपटलावर दीर्घकाळ कोरलेल्या काही कालांतराने विरळ होत जाणाऱ्या. हळूहळू नजर सरावत जाते, आणि अलगद कधीतरी आपणही त्या शहराचा एक भाग बनून गेल्याचे लक्षात येते.
    आपला भवताल आपल्यात सामावत जाण्याची ही प्रक्रिया इथे फार प्रभावी शब्दांत आणि प्रत्ययकारी वर्णनातून मांडण्यात आली आहे.
    माझ्या मते या लिखाणाचा प्राण याहून मोठा आहे. त्यामुळे, याच्या विस्ताराबाबत गांभीर्याने विचार व्हावा. त्यासाठी शुभेच्छा!!

    ReplyDelete
  3. सुंदर लिहिलंयस स्नेहल, लक्षात राहण्याजोगं. जाणिवा विस्तारत असल्याचं लक्षण म्हणजे ही पोस्ट आहे.

    ReplyDelete
  4. Sanket,
    Tulahi manapasun Dhanywad...chhyla mala parat comment karta yayla lagli majhya blogvar...kunitari hattivarun sakhar vata re...:D

    ReplyDelete
  5. hi snehu.....khup khup diwasani aj blogvishwat ale.....ani tuzi athavanzali so tulabhet dili yethe...!zakas lekh lihilayas pantari ajun comment nahi denar .....karan samrpak as kahi suchat nahiyey...ugachch wawawawa, hanchanchan mhananyat arth nahi.....tya lekhacha bhawarth samjavun ghevu de then only i willcomment..! tula parat mayajal madhe bhetun anand zala...

    ReplyDelete
  6. अंजली, मन:पूर्वक धन्यवाद...will wait for your comment

    ReplyDelete
  7. छान आहे तुमचा ब्लॉग. आवडला.
    *****
    रेषेवरची अक्षरेचं review pkg / ओळख करून देणारं segment स्टार माझावर दहाच्या बातम्यांमध्ये ऑन एअर प्रसारित झाला होता. मला ओझरता पहायला मिळाला.

    ReplyDelete
  8. मुटे सर, धन्यवाद....
    'रेषेवरची अक्षरे'सह इतरही काही अंकाचं आम्ही review pkg केलं होतं...तुम्हांला ते starmajha.newsbullet.in या वेबसाईटवर अजूनही बघायला मिळेल...

    ReplyDelete
  9. great....the way u describe i feel mumbai" in few min. . .jst wanted to see more lavishness of mumbai :)

    ReplyDelete
  10. सुंदर... मुंबईबाहेरून आलेल्यांचं मुंबईबद्दलचं मत ऐकणं, नेहमीच वेगळं असतं. छान लिहितेस, keep it up!

    PS - मुंबईच्या उंबरठ्यावर राहणाऱ्या मीही काहीतरी लिहिलं होतं या शहराविषयी.. तुला आवडेल, अशी आशाय. http://retiwarchiakshare.blogspot.in/2008/10/blog-post.html

    ReplyDelete
    Replies
    1. @ जान्हवी, मन:पूर्वक धन्यवाद......छान लिहलंयस की तू पण...!

      Delete