Friday, February 25, 2011

आजीजवळ जाऊन सगळी बडबड आणि तणतण मी केली,
माझं बोलणं ऐकून, माझे डोळे पुसून, पाठीवर हात फिरवत
आज्जी फक्त एवढंच म्हणाली,
''पोरी, आयुष्य असंच असतं''
समजूत पटल्यासारखी शांत होऊन मी खोलीच्या बाहेर पडले
तर ती हमसून -हमसून रडू लागली....
तेव्हा मी ही इतकंच म्हणाले,
''आज्जी, तू तरी कुठं सरावलीएस अजून आयुष्याला ?''

3 comments:

  1. आयुष्याचा अर्थ छान आहे.. अगदी कमी शब्दात...

    ReplyDelete
  2. आयुष्याचा अर्थ वगैरे नाही रे बाबा....थंक्स फॉर द कमेंट.

    ReplyDelete
  3. हे तरं रूपक कथेसारख वाटतंय .. मला वाटत या farmat अजून काही नवीन तुला सुचल तरं जरूर टक ब्लोग वर ..
    आणि हो तुझ्या शुभेच्छा पोचल्या बर का ! धन्यवाद !
    भावांजली
    --

    ReplyDelete