Sunday, November 14, 2010

तुम्हांला नाहीच जमायचं.....!

परवा दिवशी पिठल्यासाठी डाळीचं पीठ कालवायला घेतलं. अचानक आवाज आला, ''...तुम्हांला नाहीच जमायचं!'' मला काही कळेचना आवाज कुठुन येतोय ते ! कारण रुममध्ये मी एकटीच होते.च्यायला, आता आपल्याला एकटं असताना भास पण व्हायला लागले की काय, असा विचार करत असतानाच, पुन्हा आवाज आला '' खरंचय नाहीच जमायचं तुम्हांला...!'' पुन्हा आवाज..नीट पाहिलं तर आवाज येत होता डाळीचं पीठ कालवत असलेल्या भांड्यातूनच... !
'' कळलं का नाहीच जमायचं तुम्हांला, माझ्यासारखं सगळ्यात मिसळून जायला..कधी कधी तरीही स्वतःच अस्तित्त्व वेगळं ठेवायला..'' '' म्हणजे?'' '' मी किती वेगवेगळ्या पदार्थात सहज मिसळून जातो ,कित्ती वेळेला माझी गरज पडते तुम्हांला ! आत्ताचंच बघ...भाजीचा पटकन होणारा उत्तम पर्याय म्हणून वापरता ना ब-याचदा मला तुम्ही ?म्हणजे हा रोजचा पदार्थ झाला,पण अगदी खास म्हणवल्या जाणा-या पदार्थातही असतो मी..ढोकळा, मोहनथाळ, बेसनाचा लाडू, सुरळीच्या वड्या, म्हैसूरपाक हे पदार्थ माझ्यामुळेच ओळखले जातात. पण तरीही ब-याच भाज्यांमध्ये साईड आर्टिस्टचं कामही करतोच की मी – मेथीची, पातीची डाळीचं पीठ पेरुन केलेली भाजी, कढी किती नावं सांगू? शिवाय शेव, भजी,फरसाण या चमचमीत पदार्थांची माझ्याशिवाय कल्पना तरी करु शकता का तुम्ही ?’’
बेसन की बात सोचनेवाली थी....!!

9 comments:

 1. छान लिहिलेय. पण मला हल्ली असे वाटू लागलेय कि इन्टरनेटवरही आपले कंपू तयार होऊ लागलेत. ठरावीक लोकच वाचणार आणि ठरावीक लोकच प्रतिक्रिया देणार. यापलीकडे प्रयत्न करायला हवेत. कसे ते माहित नाही.

  ReplyDelete
 2. शंभराव्या,
  धन्यवाद, खरंय तू म्हणतोयस ते ! पण त्याच माणसांनी दिलेल्या प्रतिक्रियाही महत्त्वाच्याच असतात, निदान माझ्यासाठी तरी...

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. छान आहे लेख . सध्या विषयावरच पण वाचनीय ..मी अंजली ..तुझ्या आणि शाभाराव्याच्या ब्लॉग ची नवी follower .....माझ्या ब्लॉग विश्वात तुमच स्वागत
  http://anjalizarkar.blogspot.com/

  ReplyDelete
 5. अंजली,thanks....आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आणि फॉलोअर होण्याबद्दलही.

  ReplyDelete
 6. नमस्कार. वाढ-दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नूतनवर्षाभिनंदन! आपला मोबाईल क्रमांक माझ्याकडून हरवलाय म्हणून या औचित्यविरहित ठिकाणी शुभेच्छा द्याव्या लागताहेत. त्याबद्दल क्षमस्व!

  ReplyDelete
 7. संकेत,
  आता रागावता पण नाही येणार, धन्यवाद.

  ReplyDelete
 8. आपल्याकडे माझा नंबर असल्यास मला आपला नुंबर पाठवलं का? मी फोन करतो.

  ReplyDelete
 9. स्नेहल ..! तुझी प्रतिक्रिया पोहोचली . खूपच चं वाटले ..तुझ्या नवीन लेखाची उत्सुकतेने वाट बघतेय..
  भावांजली

  ReplyDelete