Friday, January 22, 2010

सोलापूरचे ४ हुतात्मे .


' जानेवारी ' महिना आम्हां सोलापुरकरांसाठी खूपच महत्वाचा असतो. या महिन्यातल्या दोन विशेष घडामोडी म्हणजे , एक म्हणजे संक्रांतीनिमित्त भरणारी श्री . सिद्धरामेश्वर यात्रा आणि दुसरं म्हणजे , हुतात्मा दिन. 'गड्डा ' यात्रेसंबंधी परत कधीतरी लिहीन . आज सोलापूरच्या ४ हुतात्म्यांविषयी :
माझ्या गावानं स्वातंत्र्यपूर्व काळात ३ दिवसांचं ' स्वातंत्र्य ' उपभोगलं होतं .शिवाय सोलापूर ' Muncipal Council ' (तेव्हाची , आता Muncipal Corporation ) ही स्वतःच्या इमारतीवर राष्ट्रीय झेंडा फडकवणारी देशातील पहिली Council आहे . १९३० मध्ये महात्मा गांधींना अटक ( बहुधा 'असहकार ' आंदोलनामुळे ) , झाल्यावर देशभर प्रक्षोभ उसळला , आंदोलनं , मोर्चे सुरु झाले .सोलापुरातही याचे जोरदार पडसाद उमटले होते .काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिकांनी निषेध नोंदवत सभा घेतल्या.पुण्याचे स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब भोपटकर यांच्या हस्ते ६ एप्रिल १९३० रोजी सोलापूर 'Muncipal Council ' वर राष्ट्रीय झेंडा फडकवण्यात आला . दरम्यान मंगळवार पेठ पोलीस चौकीवर, सशस्त्र हल्ला करण्यात आला . पोलीस आणि सरकारी अधिकारी गाव सोडून पळून गेले .तेंव्हा , काँग्रेसचे तेंव्हाचे नेते तुळशीदास जाधव आणि रामकृष्ण जाजू इ.नी संपूर्ण कायदा, सुव्यवस्था सांभाळली होती .( ९-११ मे १९३० )हेच ते स्वातंत्र्याचे ३ दिवस .
नंतर सोलापूरमध्ये ' मार्शल लॉं ' लागू करण्यात आला .जमावाला भडकावणे , सशस्त्र हल्ला करणे , पोलीस अधिकाऱ्यांचा जीव घेणे असे आरोप ४ जणांवर ठेवण्यात आले .त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात आला आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली . उच्च न्यायालयानेही तीच शिक्षा कायम ठेवली आणि १२ जानेवारी १९३१ रोजी चारजण पुण्यात फाशीवर चढवले गेले .हेच ते ४ हुतात्मे -
हुतात्मा मल्लाप्पा धनशेट्टी ,
हुतात्मा किसन सारडा,
हुतात्मा कुर्बान हुसेन आणि
हुतात्मा जगन्नाथ शिंदे .
सोलापूरच्या पार्क चौकात या चौघांचे पुतळे आहेत . सोलापूरच्या रंगमंदिराचं , तसच सोलापूर -पुणे एक्स्प्रेसचं नाव या हुतात्म्यांवरून देण्यात आलं आहे .

13 comments:

 1. काय ,एक लक्षात आलंय का कोणाच्या ? चक्क मागच्या तिन्ही पोस्ट्स शनिवारी आल्यायेत .शोभत नाही स्नेहल, तुझ्या स्व-परंपरेला हे !

  ReplyDelete
 2. चांगलं आहे. तुझ्या ब्लॉगवरचा font थोडा मोठा पाहिजे का? मला तसं वाटतं. बाकी छान.

  ReplyDelete
 3. धन्यवाद अवधूत . ते font चं मलाही मागे एकदा वाटून गेलंय , पण त्यासाठी तुमचीच मदत घ्यावी लागेल बहुतेक .

  ReplyDelete
 4. धन्यवाद ,शंभराव्या . अहो , तुमच्या 'कोलापूर ' बद्दल पण आम्हांला वाचायला आवडेल .जरा आमच्या सूचनेचा विचार करा .

  ReplyDelete
 5. My dear Snehal,

  Bhagat Singh, Sukhdev and Rajguru were also hanged in Lahore in 1931. The date 23 March.
  The years 1922-35 were revolutionary years, where the idea of armed rebellion was acceptable among the people. Much of the work done by the Hindustan Socialist Republican Association (HSRA) and the Bharat Naujawan Sabha was done during this period.

  Also note the Solapur Four are Hindu, Jain, Muslim, speaking Telugu, Marathi, Urdu and Hindi. This unity is an important part of Solapur's history.

  Snehal, is there any book or article in Marathi or English that has details of the Solapur rebellion?

  You should take the lead in setting up a website for the Solapur Four, along the lines of the website for Bhagat Singh and the others of HSRA: http://www.shahidbhagatsingh.org/

  Peace and love,
  - Joe.

  ReplyDelete
 6. पिंटो सर ,
  Thank you so much , माझा ब्लॉग आवर्जून पाहिल्याबद्दल !

  सर , सोलापूर हे सीमेवरच गाव आहे , कर्नाटक आम्हांला अगदी लागून आहे . सोलापुरात मुस्लीम वस्ती , तसेच आंध्र प्रदेशातून स्थलांतरित झालेले , तेलुगु विणकर मोठ्या संख्येने आहेत .

  हुतात्म्यामधली ' धार्मिक एकात्मता ' खरी आहे , पण सर दुर्दैवाने तो इतिहास आहे .गेल्या काही वर्षात सोलापुरात , धार्मिक दंगलीही मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत .

  तुम्ही विचारलंय ,पण मला असे इतिहासाचे पुस्तक माहित नाही , मी माहिती मिळवून तुम्हांला कळवेन .

  सर , special thanks , for that 'Peace & Love ' .

  ReplyDelete
 7. ha vishay tula blog var takava vatla he khup chhan ahe.. it was new and interesting for me to know about Solapur.

  ReplyDelete
 8. भांगरे बाई , अभी आपने सुना क्या है , सोलापूर के बारे में ? आखिर ये मेरा ' गॉव ' है ,special तो होगा ही |

  ReplyDelete
 9. उपयुक्त माहिती आहे यामध्ये . लहानपणी सोलापूर ला ज्या ज्या वेळी गेले तेव्हा कधीतरी हे स्मारक पाहिल्याचं आठवतंय पण त्याविषयी अशी खास काही माहिती नव्हती . आता कळली

  ReplyDelete
 10. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 11. mala solapur vishayi evadhi mahiti navati pan he
  vachalyavar abhiman vattatoy

  ReplyDelete