Monday, December 7, 2009

देती झाडं !

झाडांकडे कधी लक्षपूर्वक पाहिलंय - नाही म्हणजे वर्षानुवर्ष शिकत आलेलो , सावली देणारे , प्राणवायू देऊन आपल्याला जगवणारे , पाउस आणणारे - नजरेला सुख देणारे हे फायदे आहेतच . पण त्याशिवाय मला झाडं भावतात ती आपली मुळं घट्ट रोवून असणारी म्हणून ! ती उंचही वाढतात , पण बहुतेक झाडांची पानं मात्र जमिनीकडे झुकलेली - आपल्या मुळांकडे प्रेमाने पाहणारी ! कधी अंगावर फुलांचा पिसारा ल्यालेली , कधी फळ देणारी , कधी नुसत्याच खुळखुळ्या शेंगा देणारी , कधी नुसतीच हिरवीकंच - मला जगण्याच बळ देणारी ! अगदी वाळल्यावरसुद्धा कावळ्याला ' घरटं ' बांधायला जागा देणारी , कुरहाड चालवणार्यांच्या चुलीच इंधन बनणारी !
याउलट बरीच माणसं उद्दाम , स्वार्थी - दुसऱ्यांच्याच काय स्वतःच्याही मुळांवर , घाव घालायला मागेपुढे न बघणारी , खोट्याच्या पायावर दात विचकत उभी राहणारी !

6 comments:

  1. आपल्याकडून प्रतिक्रिया मिळाली - बरे वाटले .

    ReplyDelete
  2. asha mukpane zada barach kahi sangun jatat.. pan te tyach mukpane aplyala samjun gheta yayla have..
    mhanunach hi post mala avadli..

    ReplyDelete
  3. Thanks Sheetal - navin varshat tuzahi blog ughdun tak .

    ReplyDelete
  4. पाहणाऱ्याच्या नजरेत ते सौंदर्य असावं लागतं. सुंदर, पोस्टही आणि तुझी दृष्टीही.

    ReplyDelete
  5. धन्यवाद सुगंधा . ते दृष्टीतलं थोडं क्रेडीट माझ्या चष्म्यालाही देते !!

    ReplyDelete